आब्जे गाव वाडा तालुक्यापासुन सुमार १६ किमी अंतरावर पश्चिमेकडे वैतरणा व पिंजाळ नदिच्या संगमावर वसलेले गाव आहे. तसेच वैतरणा नदिजवळ पवित्र असे नागनाथ मंदिराच्या पायथ्याशी आब्जे गाव वसले आहे तसेच नदीवर ओझर धबधबा प्रसिद्ध आहे.
आब्जे गावास फारशी अशी राजकीय पार्श्वभूमी आढळून येत नाही. कै. राघो हरी मढवी हे ब्रिटिश कालीन सदस्य होते.ग्रामपंचायत आब्जे ही दोन महसूल गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत बनलेली आहे.सध्यस्थितीत येथे नऊ सदस्य व सरपंच मिळून दहा सदस्य आहेत. ग्रामपंचायतच्या अधिपत्यात दोन जि.प.शाळा व तीन अंगणवाडी येतात.
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.